दापोली : समुद्रकिनारी 35 ते 49 वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

banner 468x60

दापोली तालुक्यातील उटंबर समुद्रकिनारी समुद्राच्या पाण्यातून वाहून आलेला एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी, ८ सप्टेंबर रोजी सकाळी समोर आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजण्यापूर्वी उटंबर येथील समुद्राच्या खडकाळ किनाऱ्यावर अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयाच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. समुद्राच्या पाण्यातून हा मृतदेह वाहून आल्याचे प्राथमिक माहितीत नमूद करण्यात आले आहे.

मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून त्याचे पूर्ण नाव व गावाची माहिती उपलब्ध झालेली नाही. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आमृ. क्रमांक ६६/२०२६, बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये बेवारस मृतदेहाची नोंद करण्यात आली आहे.

मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी दापोली पोलिसांकडून तपास सुरू असून, संबंधित व्यक्तीबाबत कोणतीही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आणि तो अपघात, आत्महत्या की अन्य प्रकार आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलीस आसपासच्या भागातील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची तपासणी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *