दापोली : व्यापारी संघटना बंदमध्ये सहभागी होणार नाही

banner 468x60

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने उद्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.

अखेर अशाप्रकारे बंद घोषीत करणे बेकायदा असून कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे उद्या काहीही बंद नसेल .

दरम्यान दापोली व्यापारी महासंघटना कोणत्याही राजकीय वा इतर संस्थांनी पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी होणार नाही.

दापोली व्यापारी महासंघटनेच्या या ठाम निर्णयाचं निवेदन तहसिलदार अर्चना बोंबे यांना देताना दापोली व्यापारी महासंघटनेचे प्रमुख दिनेश नायक, दिनेश जैन, राजेंद्र पेठकर, माणिक दाभोळे, युवराज पेठे, महेश जैन, रामभाऊ मेहता, स्वप्निल खेडेकर, किशोर बोधे आदी व्यापारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *