दापोली : एसटी स्टॅन्डजवळ इको गाडीतून बेकायदा दारू वाहतूक पकडली, 2.30 लाखांचा मुद्देमाल जप्त

banner 468x60

दापोली पोलिसांनी १७ एप्रिल २०२०६ शुक्रवारी दुपारी बेकायदा देशी दारू व बिअरची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत सुमारे २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास दापोली बसस्थानकाजवळील चौकात वाहतूक कोंडी झाली होती.

banner 728x90

त्या ठिकाणी पोलिसांचे पथक वाहतुकीचे नियमन करत असताना एक संशयास्पद मारुती इको (क्र. एमएच.०८.आर.८६३६) वाहन त्यांच्या नजरेस पडले. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी दारू व विविध ब्रँडची बिअर आढळून आली.


वाहन चालक ऋतिक संतोष लांबे याच्याकडे मद्य बाळगण्याचा किंवा वाहतूक करण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यानंतर वाहनासह चालकाला पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
तपासणीदरम्यान वाहनातून २६ हजार ८८० रुपये किमतीच्या जीएम संत्रा देशी दारूच्या १८० मिलीच्या ३३६ बाटल्या, ८ हजार रुपये किमतीच्या ९० मिलीच्या २०० बाटल्या, ७ हजार २०० रुपये किमतीचे ५०० मिली ट्युबर्ग बिअरचे ४८ टीन, ९ हजार ६०० रुपये किमतीच्या ६५० मिलीच्या ४८ बाटल्या, ७ हजार २० रुपये किमतीच्या किंगफिशर बिअरच्या ३६ बाटल्या, ३ हजार ६०० रुपये किमतीचे २४ टीन, तसेच ६ हजार ४८० रुपये किमतीचे लंडन पिल्सनर बिअरचे ४८ टीन आणि ११ हजार ८८० रुपये किमतीच्या ७२ काचेच्या बाटल्या असा मद्यसाठा आढळला. याशिवाय सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहनही जप्त करण्यात आले.


एकूण २ लाख ३० हजार ६६० रुपये किमतीचा मुद्देमाल पंचनामा करून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *