दापोली : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा, शिवाजीनगर-भौंजाळी हिने शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या विविध उपक्रमांच्या बळावर सन २०२४-२५ या वर्षासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेचा प्रतिष्ठेचा ‘आदर्श शाळा पुरस्कार’ पटकावला आहे. हा मानाचा पुरस्कार १३ जुलै २०२६ रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
शाळेने वर्षभरात शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, विविध शैक्षणिक व क्रीडा उपक्रम, स्पर्धा परीक्षा, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, शाळेची आकर्षक रंगरंगोटी, पटसंख्या वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी केली. या सर्व बाबींची दखल घेत शाळेला हा सन्मान प्रदान करण्यात आला.
याशिवाय पंचायत समिती दापोलीच्या ‘व्हिजन दापोली’ उपक्रमांतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून शाळेने आदर्श कार्याची नोंद केली आहे.
शाळेच्या या यशामागे सरपंच सुवर्णा अबगुल, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवप्रताप राणे, शिक्षणतज्ज्ञ सचिन सावंत, गणेश रेवाळे, समितीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ आणि पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
तसेच पंचायत समितीचे सभापती उन्मेष राजे, सदस्य सुवर्णा खळे, जिल्हा परिषद सदस्या ऐश्वर्या धाडवे, गटविकास अधिकारी मंडलिक, गटशिक्षणाधिकारी सांगडे आणि केंद्रप्रमुख सुनील कारखेले यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेच्या प्रगतीला मोठी चालना मिळाली.
मुख्याध्यापक विश्वास भोपे आणि उपशिक्षिका सरिता हजारे यांच्या नेतृत्वाखाली शाळेने मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल संपूर्ण दापोली तालुक्यातून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













