Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

दापोली : दुसऱ्या विवाहाच्या वादातून मुलाकडून वडिलांना मारहाण, दापोलीत गुन्हा दाखल

banner 468x60

दापोली तालुक्यातील करंजाणी-कातळवाडी येथे कौटुंबिक वादातून मुलाने आपल्या वडिलांना व सावत्र आईला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी वृद्ध शेतकऱ्यावर उपचार करण्यात आले आहेत.

banner 728x90

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १३ जून २०२६ रोजी सायंकाळी ७.३० ते ८ वाजण्याच्या दरम्यान करंजाणी-कातळवाडी येथे घडली. याप्रकरणी सुरेश श्रीपद आये (वय ६७, व्यवसाय शेती, रा. करंजाणी-कातळवाडी, ता. दापोली) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, सुरेश आये व त्यांची पत्नी सुरेखा हे घरात असताना त्यांचा मुलगा सुरेंद्र सुरेश आये (वय ३७) हा मद्यप्राशन करून घरी आला. फिर्यादींनी दुसरा विवाह केल्याच्या रागातून त्याने सुरेखा यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्यानंतर वाद वाढल्याने मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या वडिलांनाही आरोपीने शिवीगाळ व धक्काबुक्की केली.

इतक्यावर न थांबता आरोपीने हाताने मारहाण केली तसेच घरातील फायबरची खुर्ची डोक्यात मारल्याने सुरेश आये जखमी झाले. घटनेनंतर जखमींनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२०/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ३५२, ११५(२) तसेच शिवीगाळ व धमकीसंदर्भातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा १४ जून २०२६ रोजी पहाटे २.२९ वाजता नोंदविण्यात आला.

पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू असून कौटुंबिक वादातून घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *