Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

दापोली : एक दिवस समाजासाठी, उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

banner 468x60

दापोलीमध्ये एक दिवस समाजासाठी, उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक 02 ऑगस्ट रोजी मळे ते जालगाव आणि दाभोळ रोड वरील रस्त्याच्या साइड पट्टीवरील वाढलेल्या झाडी, झुडप तोडण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कामाची सुरुवात मळे येथून सकाळी 9 वाजता झाली, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत काम सुरू होते.
या उपक्रमाला जालगाव विभागातून मोठ्या प्रमाणात उत्फुर्त शिवसैनिक आणि जागृत नागरिकांनी सहभाग घेतला जवळपास 45 जणांनी यामध्ये सहभाग घेतला.

मळे ते उंबर्ले सुमारे 10 किलोमीटर अंतराची झाडी तोडून पूर्ण स्वच्छ करण्यात आलीझाली.

जालगाव तालुका समन्वयक,दापोली, शैलेश पांगत यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Response (1)

  1. खरंच अस प्रत्येक ठिकाणी व्हायला हवं…..आपण समाजाचं ऋणी लागतो….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *