Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

दापोली हर्णे हल्ला प्रकरण : पाच आरोपींसह एका अल्पवयीन मुलाची जामिनावर मुक्तता

banner 468x60

दापोली तालुक्यातील हर्णे येथील गोवा किल्ला परिसरात दोन युवकांवर झालेल्या हल्ल्याच्या गाजलेल्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींसह एका अल्पवयीन मुलाची खेड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून परिसरात याबाबत चर्चा सुरू आहे.

banner 728x90

हर्णे येथील गुरववाडीतील चिन्मय गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पाजपंढरी येथील महेंद्र रघुवीर यांच्यावर काही तरुणांनी हल्ला करून त्यांना गंभीर दुखापत केल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर हर्णे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हाती घेत संशयितांचा शोध सुरू केला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी झेन हुनेरकर (वय २२), मुफिज सोलकर (वय २३), सलाउ कोंडविलकर (वय १९), नाबील काझी (वय १९) आणि जैब जमादार (वय २०) या पाच जणांना अटक केली होती. तसेच या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याविरोधातही कायदेशीर कारवाई करण्यात आली होती.


दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या वतीने खेड येथील वकील अॅड. सुधीर बुटाला यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेण्यात आले. प्रकरणातील उपलब्ध पुरावे, तपासाची सद्यस्थिती आणि कायदेशीर बाबींचा विचार करून न्यायालयाने सर्व आरोपींना जामीन मंजूर केला. तसेच अल्पवयीन मुलालाही नियमानुसार जामिनावर मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले.

या घटनेमुळे हर्णे आणि परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली. आरोपींना जामीन मिळाला असला तरी त्यांच्यावरील आरोप कायम असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तपासातून समोर येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे पुढील न्यायालयीन प्रक्रिया पार पडणार आहे.

हर्णे परिसरात घडलेल्या या घटनेने स्थानिक पातळीवर मोठी खळबळ उडाली होती. आता न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केल्याने प्रकरणाचा पुढील तपास आणि न्यायालयीन सुनावण्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *