दापोलीतील हर्णे गावातील रस्ते खोदून भूमिगत केबल टाकल्यानंतर पावसाळ्यात निर्माण झालेल्या समस्येची दखल घेत कोकण कट्टा न्यूजने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर स्थानिक ग्रामस्थांनीही आवाज उठवत संबंधित विभागाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.

महाराष्ट्र राज्य वीज मंडळाकडून (MSEB) भूमिगत केबल टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आला होता. मात्र, कामानंतर रस्त्याची योग्य प्रकारे डागडुजी न झाल्याने पावसाळ्यात रस्त्यावर चर व खड्डे निर्माण झाले होते. यामुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.
स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर प्रशासनाने उशिरा का होईना, याची दखल घेत रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये लाल डबा टाकून तात्पुरत्या स्वरूपात बुजवण्याचे काम केले आहे. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास काही प्रमाणात कमी झाला आहे.

या समस्येला वाचा फोडून प्रशासनाचे लक्ष वेधल्याबद्दल पत्रकारांचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. पत्रकारांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचत असून, त्यातून विकासकामांना गती मिळत असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.
यावेळी हर्णे येथील ग्रामस्थ भास्कर अनंत जोशी यांनी कोकण कट्टा न्यूजसह सर्व पत्रकार बांधवांचे जाहीर आभार मानले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













