Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

दापोली : शास्त्रीय शेतीची कास, दापोलीत शेतकऱ्यांना मिळाले मृदापरीक्षणाचे धडे

banner 468x60

दापोली, सागर गोवळे, प्रतिनिधी : आधुनिक शेतीत वाढते उत्पादन, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे आणि खतांचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी मृदापरीक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

banner 728x90

याच पार्श्वभूमीवर कृषी महाविद्यालय दापोलीच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत ‘कृषी स्नेही गटा’च्या वतीने देऊळवाडी येथे मृदापरीक्षण प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

देऊळवाडी येथील शेतकरी गोपाळ परांजपे यांच्या शेतात पार पडलेल्या या प्रात्यक्षिकामध्ये विद्यार्थ्यांनी मातीचे नमुने घेण्याची शास्त्रशुद्ध पद्धत प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली. जमिनीचे आरोग्य समजून घेतल्यास खतांचा संतुलित वापर करता येतो आणि उत्पादन खर्चात बचत होते, याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी शेतातून प्रतिनिधिक नमुना गोळा करण्यासाठी ‘झिग-झॅग’ पद्धतीचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. तसेच नमुना घेण्याची योग्य खोली, योग्य वेळ, नमुना वाळविण्याची प्रक्रिया, संमिश्र नमुना तयार करण्याची पद्धत आणि प्रयोगशाळेत तपासणीसाठी नमुना पाठविण्याची अचूक कार्यपद्धती याबाबत माहिती देण्यात आली.

उपस्थित शेतकऱ्यांनी माती परीक्षण, खत व्यवस्थापन आणि उत्पादनवाढ यासंदर्भातील विविध प्रश्न उपस्थित करून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या उपक्रमामुळे मातीच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास मदत झाली असून शास्त्रीय शेती पद्धतींचा अवलंब करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.

या उपक्रमात समृद्धी जाधव, अंकिता मुंज, कोमल झिरवाल, निलम मदने, श्रावणी मोरे, श्रुती बोबडे, सलोनी सावंत, तन्वी नादिवडेकर, आकांक्षा गाडगे आणि साक्षी लोके या विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग घेत आयोजनाची धुरा सांभाळली.

प्रात्यक्षिकासाठी डॉ. रमेश कुणकेरकर, डॉ. अशोक चव्हाण, डॉ. विजय देसाई, अस्लम डोसानी, डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांचे मार्गदर्शन लाभले.

या उपक्रमामुळे देऊळवाडी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मृदापरीक्षणाचे महत्त्व, जमिनीच्या आरोग्याचे संवर्धन आणि संतुलित खत व्यवस्थापनाबाबत प्रभावी जनजागृती झाली असून, शास्त्रीय शेतीकडे वाटचाल करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *