दाभोळ : डॉ.आनंद गोंधळेकर यांचे वडील माधव गोंधळेकर यांचं निधन

banner 468x60

दाभोळमधील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असलेले माधव कृष्णाजी गोंधळेकर यांचं निधन झालं आहे. दि. 9 डिसेंबर रोजी दुपारी 3 : 30 वाजता त्यांच्या दाभोळ येथील “कृष्णकुंज” या निवासस्थानी निधन झाले.

मृत्युसमयी त्यांचे वय 89 वर्षे ईतके होते. दाभोळ गावातील जिल्हा परिषद शाळेवरील एक शिस्तप्रिय, रोखठोक व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा आदरयुक्त दरारा होता. त्यांच्या शिक्षक कारकिर्दीत त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले.

त्यांचे अंत्य दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थ, त्यांचे माजी विद्यार्थी यांनी गर्दी केली होती. दि. 9 डिसेंबर रात्री 11 वाजता शोकाकुल वातावरणात दाभोळ-भंडारवाडा येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पच्छात एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. कोकण कट्टा न्यूज परिवार आणि संपादक तेजस बोरघरे यांच्याकडून माधव गोंधळेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *