Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

खेड : पैशांच्या वादातून घरात घुसून दाम्पत्याला मारहाण, चौघांविरोधात गुन्हा दाखल

banner 468x60

खेड तालुक्यातील दस्तुरी-चिंचघर येथे पैशांच्या वादातून एका महिलेसह तिच्या पतीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चार जणांविरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

याबाबत सौ. रश्मी विजय भोजानी (वय ३४) यांनी फिर्याद दिली आहे. त्या चिंचघर, दस्तुरी येथे भाड्याने राहत असून मूळच्या पन्हाळजे, सुतारवाडी (ता. दापोली) येथील आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४.४५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे पती विजय भोजानी हे घरी असताना पैशांच्या वादावरून आरोपी कमल विकास पवार (५५), अर्जुन विकास पवार (२५), अक्षय विकास पवार (२४) आणि शुभम नलावडे (२४, पूर्ण नाव माहित नाही), सर्व रा. दस्तुरी-चिंचघर हे त्यांच्या घरी आले.

आरोपींनी घरात घुसून रश्मी भोजानी यांना हाताने थपडा मारल्या तसेच फावड्याच्या लाकडी दांडक्याने मानेवर व डाव्या कानाखाली मारहाण केली. तसेच त्यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूस दगड फेकून दुखापत केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या झटापटीदरम्यान आरोपी कमल पवार हिने फिर्यादीच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून नुकसान केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, वाद सोडविण्यासाठी आलेले पती विजय अमृतलाल भोजानी यांनाही आरोपी अर्जुन व अक्षय पवार यांनी हाताने, लाकडी दांडक्याने तसेच दगडाने मारहाण करून दुखापत केल्याचा आरोप आहे.

यावेळी आरोपींनी रश्मी भोजानी व त्यांच्या पतीला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *