चिपळूण : गणेशोत्सवानिमित्त चिपळूण नागरी पतसंस्थेची खास ठेव योजना जाहीर, “आपली माणसे! आपली संस्था!!” ब्रीदवाक्याच्या आधारे ग्राहकहिताला प्राधान्य

banner 468x60

गणेशोत्सवाचे औचित्य साधत कोकणातील प्रसिद्ध चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने ग्राहकांसाठी विशेष ठेव योजना जाहीर केली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात विस्तारलेल्या शाखांच्या माध्यमातून ही योजना सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

पतसंस्थेने नेहमीच “आपली माणसे! आपली संस्था!!” या ब्रीदवाक्याशी सुसंगत पद्धतीने ग्राहकांचे हित जोपासले आहे. याच परंपरेतून यावर्षीच्या गणेशोत्सवानिमित्त “आनंद उज्वल बचतीचा – आनंद नूतन ठेवीचा” या योजनेची घोषणा करण्यात आली आहे.


या योजनेअंतर्गत:

१ ते २ महिन्यांच्या मुदत ठेवींवर ९% व्याजदर

३ ते ११ महिन्यांच्या मुदत ठेवींवर ९.५% व्याजदर
ग्राहकांना मिळणार आहे.

ही ठेव योजना कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व शाखांमध्ये लागू असणार असून, अधिक माहितीसाठी ग्राहकांनी आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.संस्थेने विविध कर्ज योजना, मासिक बचत योजना आणि आकर्षक ठेव पर्यायांच्या माध्यमातून सर्व स्तरातील ग्राहकांना लाभ देण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे.

आपल्या उज्वल भविष्याची आर्थिक तरतूद करण्यासाठी ही योजना एक सुवर्णसंधी ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *