चिपळूण : मटका जुगारावर पोलिसांची कारवाई, एक जण ताब्यात

banner 468x60

चिपळूण शहराजवळील पिंपळी खर्डनाका परिसरात सुरू असलेल्या बेकायदा मटका जुगार अड्ड्यावर चिपळूण पोलिसांनी छापा टाकून एका व्यक्तीवर कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १५ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.३५ वाजण्याच्या सुमारास पिंपळी खर्डनाका येथील श्री मेडिकल व एटीएम गाळ्यांच्या मागील बाजूस, संदिप पवार यांच्या घरालगत असलेल्या दुकान गाळ्यांना लागून असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी लक्ष्मण कृष्णा पवार (वय ३२, रा. पिंपळी बुद्रुक, पेढांबे ब्रिजजवळ, ता. चिपळूण) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या तपासात आरोपी हा “कल्याण” नावाने ओळखल्या जाणाऱ्या मटका जुगाराचे आकडे स्वीकारून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांकडून बेकायदेशीरपणे पैसे घेत जुगार खेळवत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडे कोणताही वैध परवाना नसताना तो हा व्यवसाय करत असल्याचे आढळून आले.

छाप्यादरम्यान पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून १ हजार २८० रुपये रोख रक्कम तसेच जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ हजार २८५ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७५/२०२६ नोंद करण्यात आला असून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *