Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

चिपळूण : उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन, विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू

banner 468x60

चिपळूण शहरातील मुरादपूर परिसरात राहणाऱ्या एका ३४ वर्षीय विवाहितेचा उंदीर मारण्याचे विषारी औषध प्राशन केल्यानंतर उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश मंदिराजवळील सायली बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या अक्षता सुमित दुरगुळे (वय ३४) यांनी उंदीर मारण्यासाठी वापरण्यात येणारे ‘रेटॉल’ हे विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना अचानक उलट्या व जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला. प्रकृती खालावत असल्याचे लक्षात येताच त्यांच्या पतीने त्यांना तातडीने उपचारासाठी चिपळूण येथील ‘लाईफ केअर’ रुग्णालयात दाखल केले.


रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी पुढील विशेष उपचारांची गरज व्यक्त केली. त्यानुसार त्यांना मुंबई येथील केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय उपचार सुरू असतानाच ३ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेची माहिती मृत महिलेच्या आई अनुराधा अनिल गुजर यांनी चिपळूण पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी आवश्यक नोंदी करून प्रकरणाचा तपास सुरू केला. याप्रकरणी २२ जून रोजी चिपळूण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अक्षता दुरगुळे यांनी विषारी औषधाचे सेवन नेमक्या कोणत्या कारणामुळे केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पोलिसांकडून विविध अंगांनी तपास केला जात असून संबंधित कुटुंबीय व इतर व्यक्तींची माहिती घेण्यात येत आहे.


अक्षता यांच्या निधनाची बातमी समजताच मुरादपूर परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या अकाली निधनामुळे नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांच्या तपासानंतरच या प्रकरणामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *