Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

रत्नागिरी पोलिसांची मोठी कामगिरी : मध्यप्रदेशातील खून प्रकरणातील तीन फरार आरोपी रत्नागिरीतून अटकेत

banner 468x60

मध्यप्रदेशातील झाबुवा जिल्ह्यात घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणातील तीन फरार आरोपींना अटक करण्यात रत्नागिरी पोलिसांना उल्लेखनीय यश मिळाले आहे. अत्यंत गुप्त आणि नियोजनबद्ध कारवाईत हे आरोपी रत्नागिरी शहरात लपून बसले असताना जेरबंद करण्यात आले.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, झाबुवा येथील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी घटनेनंतर फरार झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी झाबुवा पोलिसांनी विशेष पथकाची नियुक्ती केली होती. तपासादरम्यान आरोपी महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे लपून बसल्याची खात्रीशीर माहिती समोर आली.

या माहितीच्या आधारे झाबुवा पोलिसांचे पथक रत्नागिरीत दाखल झाले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहकार्याने आरोपींच्या हालचालींवर गोपनीय पाळत ठेवण्यात आली. पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने कौशल्यपूर्ण सापळा रचत योग्य वेळी कारवाई केली आणि तिन्ही आरोपींना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे दाउद चिलिया वाकला, नब्बु चिलिया वाकला आणि चिलिया कलिसींग वाकला (सर्व रा. झाबुवा, मध्यप्रदेश) अशी आहेत. या आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १९१(१), १९१(२), १९१(३), १९०, १०३(१), २९६(१) आणि ३५१(२) अन्वये गंभीर गुन्हे नोंद आहेत.

अटकेनंतर संबंधित आरोपींवर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून पुढील तपासासाठी त्यांना झाबुवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमुळे खून प्रकरणाच्या तपासाला गती मिळणार असून इतर संबंधित बाबी उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी माईणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक विवेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, दीपक साळवी, भालचंद्र मयेकर आणि निलेश शिंगावे यांनी सक्रिय भूमिका बजावली.

दरम्यान, परराज्यातील गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींना शोधून काढून अटक केल्यामुळे रत्नागिरी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *