रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील सावर्डे बाजारपेठेत रविवारी एका महिलेच्या पर्समधून ५५,२२० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
ही चोरी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी दिपाली दत्ताराम लाड (वय ५२, व्यवसाय नोकरी) या सध्या डोंबिवली इस्ट येथील शिवशगनम बिल्डिंगमध्ये राहतात आणि त्यांचं मूळ गाव ढाकमोली, सहाणवाडी (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) आहे. आज, दि. २३ मार्च २०२५ रोजी त्या सावर्डे बाजारपेठेत भाजी आणि मासे खरेदी करण्यासाठी आल्या होत्या.
खरेदी करत असताना त्यांनी आपली पर्स जवळ ठेवली होती. मात्र, या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या संमतीशिवाय पर्समधून सोन्याची चैन आणि रोख रक्कम चोरून नेली.
चोरीला गेलेला माल चोरीला गेलेल्या मालाची एकूण किंमत ५५,२२० रुपये आहे. यामध्ये १०,२२० रुपये रोख रक्कम आणि १५ ग्रॅम वजनाची ४५,००० रुपये किमतीची सोन्याची चैन यांचा समावेश आहे.
बाजारपेठेतील गजबजलेल्या वातावरणात ही चोरी झाल्याने स्थानिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.पोलिसांत तक्रार दाखल या घटनेनंतर दिपाली लाड यांनी तात्काळ चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली.
त्यांच्या फिर्यादीवरून आज दुपारी ३.२० वाजता भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा क्रमांक ३४/२०२५ असा नोंदवण्यात आलेला हा गुन्हा अज्ञात चोरट्याविरुद्ध आहे, ज्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569 Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*