Breaking News
रत्नागिरी : स्वच्छ सर्वेक्षणात रत्नागिरीचा देशात डंका, देशात पटकावला तिसरा क्रमांक, स्वच्छतेच्या राष्ट्रीय स्पर्धेत रत्नागिरीची दमदार कामगिरी रत्नागिरी : स्वप्नाली सावंत हत्या प्रकरणात पती सुकांतसह नोकराचा जामीन अर्ज फेटाळला; रत्नागिरी सत्र न्यायालयाचा निर्णय, चार वर्षांहून अधिक काळ कारागृहात चिपळूण : रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूस पार्किंग व्यवस्था करा, शौकतभाई मुकादम यांची मागणी मंडणगडच्या दोन शाळकरी मुलींची भरारी थेट अमेरिकेत! गोठे आणि वेसवीच्या अपेक्षा-मानस करणार अंतराळ संशोधन केंद्राला भेट, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची सातासमुद्रापार झेप संगमेश्वर : देवरुखजवळ बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास, सोन्याचे दागिने आणि 1.70 लाखांची रोकड चोरी

रत्नागिरी : एसटी बस आणि दुचाकीचा अपघात

banner 468x60

रत्नागिरी शहरातील चर्मालय येथे एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली आहे यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला आहे.

यामध्ये दुचाकीस्वाराच्या हाताला आणि पायाला मार लागलाय. रत्नागिरी येथील चर्मालय येथे एसटी आणि दुचाकी यांच्यामध्ये जोरदार अपघात झाला.

या अपघातात राहुल सुरेश तेरवणकर (वय 36 रा कारवांचीवाडी) हा गंभीररीत्या जखमी झाला. मंगळवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान हा अपघात झाला.

अपघातानंतर अर्धा तास होऊनही अँब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली नव्हती. कोकण नगर वरून मारुती मंदिर ज्या दिशेने येणाऱ्या सिटी बस आणि दुचाकी स्वार चंपक मैदान येथून साळवी स्टॉपच्या दिशेने जात होता.

यावेळी हा अपघात घडला. या अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला असून त्यांच्या हाताला व पायाला मार लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *