गुहागर तालुक्यातील कोकण एलएनजीमध्ये
पॅन्ट्री विभागात सुपरवायझर म्हणून कामाला असलेल्या गितेश मुरटे यांनी गळफास लावून केलेल्या आत्महत्येप्रकरणी कोकण एलएनजीच्या अधिकाऱ्यासमवेत दोन कामगार अशा तिघांवर गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ नोव्हेंबर २०२४ रोजी ही घटना घडली होती. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये कोकण एलएनजीमधील अधिकारी कुमार स्वामी बटुला, (५३, आरजीपीपीएल कॉलनी), राहुल रघुनाथ रहाटे, (३४, जानवळे), साहील संतोष महाडिक, (२५, पालपेणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आत्महत्या करणारा गितेश विलास मुरटे, (३१, मूळ अंधेरी ईस्ट, मुंबई) नोकरीनिमित्त गुहागर बाग येथे भाड्याच्या घरामध्ये रहात होते .
११ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांनी भाड्याच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्यांचा भाऊ श्रीकांत विलास मुरटे यांनी गुहागर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
त्यानुसार या घटनेचा पोलीस उपनिरीक्षक सुजित सोनावणे अधिक तपास करत होते. तिघांनी मृत गितेश मुरटे यांना क्षुल्लक कारणावरून तसेच कामाचा दबाव टाकून, वारंवार उद्धटपणे बोलून मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















