Breaking News
खेड : भोस्ते घाटात कारला कंटेनरची पाठीमागून जोरदार धडक, कार महामार्गावरून खाली, कारचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली चिपळूण : कटरे येथे वादातून शेतकऱ्याला मारहाण, लाकडी दांडक्याच्या प्रहारात कानाला दुखापत, लाथ मारून ढकलले, त्यानंतर दांडक्याने हल्ला, वैभव शिर्केविरोधात सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल राजापूर : 28 वर्षीय तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, पत्नीला बाहेर जाऊन येतो सांगून घरातून पडला बाहेर दापोली : आंजर्लेच्या खाडीत रेती माफियांचा रात्रीस खेळ! आंजर्लेच्या खाडीत रात्रभर रेती उपसा, तरीबंदर ते गणेश गल्लीपर्यंत रेती उपशाच्या तक्रारी समोर, महसूल विभागाचे दुर्लक्ष? चिपळूण : तालुक्यात दोन घरफोड्या; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 4 लाख 26 हजारांचा मुद्देमाल चोरीला

रत्नागिरी : 3 अल्पवयीन विद्यार्थिनींनी फिनेल प्राशन केल्याने खळबळ

banner 468x60

रत्नागिरी जिल्हयातील एका तालुक्यातील वसतीगृहामध्ये वास्तव्यास तीन अल्पवयीन विद्यार्थिनींनी फिनेल प्राशन केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे.

या तिन्ही विद्यार्थिनींवर जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. वसतीगृहात अभ्यासावरून वारंवार टोमणे मारून बोलले जात असल्याने त्याला कंटाळून त्यांनी विष प्राशन केल्याचे समजते.

पोलिसांकडून त्यांचा जबाब घेण्याचे काम सुरू होते. प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी ७वाजण्याच्या सुमारास या विद्यार्थिनींनी फिनेल प्राशन केले.

त्यानंतर त्यांना उलट्या होऊ लागल्याने वसतीगृहातील कर्मचाऱ्यांनी त्यांना तत्काळ तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी त्यांनी फिनेल प्राशन केल्याची बाब पुढे आली.

नंतर अधिक उपचारासाठी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तीनही विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टर व पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *