चिपळुण : गुगल पे, चेकने महिलेची 20 लाखाची फसवणूक, सचिन येळवीवर गुन्हा दाखल

banner 468x60

चिपळूणमध्ये पुन्हा फसवणुकीचा प्रकार समोर आलं आहे. गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर दर दिवशी चांगला परतावा देतो असे भासवून एका तरुणाने महिलेला तब्बल 20 लाख 82 हजार 9 रुपये इतक्या रक्कमेला फसवल्याचा प्रकार पुढे आला आहे.

banner 728x90 banner 728x90

याप्रकरणी अलोरे-शिरगांव पोलीस ठाण्यात त्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आली आहे. सचिन चांगदेव येळवी (36, खेर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद एका महिलेने दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर दर दिवशी चांगला परतावा देतो असे सचिन येळवी याने सदर महिलेला सांगितले होते. त्यावर विश्वास ठेवून या महिलेने 7 जुलै 2023 ते डिसेंबर 2023 पर्यंत घरातून वेळोवेळी गुगल पे, चेक अशा स्वरुपात एकूण 22 लाख 66 हजार 234 रुपये इतकी रक्कम दिलेली आहे.

त्यापैकी येळवी याने त्या महिलेला 1 लाख 84 हजार 224 रुपये इतकी रक्कम परत दिलेली आहे. तसेच 20 लाख 82 हजार 9 रुपये इतकी रक्कम परत दिलेली नाही.

या रक्कमेची येळवी याच्याकडे वारंवार मागणी केली असता तो काही ना काही कारण सांगून उडवा उडवीची उत्तरे या महिलेला देत असे. यातूनच आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात येताच या महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार सचिन येळवी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *