Breaking News
खेड : भोस्ते घाटात कारला कंटेनरची पाठीमागून जोरदार धडक, कार महामार्गावरून खाली, कारचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली चिपळूण : कटरे येथे वादातून शेतकऱ्याला मारहाण, लाकडी दांडक्याच्या प्रहारात कानाला दुखापत, लाथ मारून ढकलले, त्यानंतर दांडक्याने हल्ला, वैभव शिर्केविरोधात सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल राजापूर : 28 वर्षीय तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, पत्नीला बाहेर जाऊन येतो सांगून घरातून पडला बाहेर दापोली : आंजर्लेच्या खाडीत रेती माफियांचा रात्रीस खेळ! आंजर्लेच्या खाडीत रात्रभर रेती उपसा, तरीबंदर ते गणेश गल्लीपर्यंत रेती उपशाच्या तक्रारी समोर, महसूल विभागाचे दुर्लक्ष? चिपळूण : तालुक्यात दोन घरफोड्या; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 4 लाख 26 हजारांचा मुद्देमाल चोरीला

रत्नागिरी : आळशी ठेकेदाराने केवळ रस्ता खणून ठेवला, मोरीचे काम अपूर्ण

banner 468x60

शहरानजीकच्या नाचणे- गुरुमळीवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोरी बांधण्यासाठी मागील महिनाभर रस्ता खणण्यात आला असून, मोरी बांधण्याचे काम बंद असल्याने रात्रीच्यावेळी पादचारी ग्रामस्थ व दुचाकीस्वारांना प्रवास करणे कठीण झाले आहे.

त्यातच एसटी बस बंद झाल्यामुळे शाळकरी मुलांचेही हाल होत असून, हे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी गुरुमळीवासीयांनी केली आहे.


नाचणे गोडावून स्टॉप येथून गुरुमळीत जाणाऱ्या रस्त्यावर बाणेवाडीच्या पुढे असणाऱ्या छोट्या नाल्यावर मोरी बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. नाल्यामध्ये गाळ भरल्यामुळे मोठया पावसात रस्त्यावरून पाणी वाहते. त्यामुळे मोरीची उंची वाढवून नव्याने काम होणार आहे.

मागील महिनाभरापासून पहिली मोरी खणून काम सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी आंबाबागेमधून तात्पुरता छोटा रस्ता उभारण्यात आला असून, त्यातून दुचाकी व तीनचाकी वाहनेच जात आहेत. जुनी मोरी खणल्यामुळे गुरुमळीत जाणारी एसटी बस सेवा बंद झाली आहे. गॅस वाहतूकही बंद असल्याने सिलेंडरसाठी ग्रामस्थांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.

हा रस्ता खणून महिना होत आला आहे, त्यातील तीन ते चारच दिवस काम झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संथगतीने काम झाल्यास पावसाळा उजडेल अशी भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली. शाळांच्या परीक्षा सुरु होतील. शिमगोत्सव लवकरच सुरु होणार आहे.

या रस्त्याचा वापर गुरुमळीतील सर्व ग्रामस्थ करीत असतात. विकासकामांना ग्रामस्थांचे सहकार्य आहेच; परंतु ठेकेदाराने लवकर काम पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *