Breaking News
खेड : भोस्ते घाटात कारला कंटेनरची पाठीमागून जोरदार धडक, कार महामार्गावरून खाली, कारचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली चिपळूण : कटरे येथे वादातून शेतकऱ्याला मारहाण, लाकडी दांडक्याच्या प्रहारात कानाला दुखापत, लाथ मारून ढकलले, त्यानंतर दांडक्याने हल्ला, वैभव शिर्केविरोधात सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल राजापूर : 28 वर्षीय तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, पत्नीला बाहेर जाऊन येतो सांगून घरातून पडला बाहेर दापोली : आंजर्लेच्या खाडीत रेती माफियांचा रात्रीस खेळ! आंजर्लेच्या खाडीत रात्रभर रेती उपसा, तरीबंदर ते गणेश गल्लीपर्यंत रेती उपशाच्या तक्रारी समोर, महसूल विभागाचे दुर्लक्ष? चिपळूण : तालुक्यात दोन घरफोड्या; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 4 लाख 26 हजारांचा मुद्देमाल चोरीला

दापोली : दापोली-रत्नागिरी, मुंबई, धुळे, भाईंदर मार्गावर नव्या एसटीच्या बसेस

Screenshot

banner 468x60

दापोली आगाराला नव्या मिळालेल्या बीएस 6 प्रणालीच्या बसेस विविध मार्गांवर कार्यान्वित करण्यात आल्या असल्याची माहिती आगारातून देण्यात आली आहे. नव्या बसेसमुळे दापोलीतून धुळे मार्गावर थेट सेवा सुरू करण्यात आली आहे.

स. 6.30 वाजता दापोली-नाशिक-धुळे व पहाटे 5.15 वाजता धुळे नाशिक-दापोली या मार्गावर दोन बसेस, स. 6 वाजता दापोली-मुंबई व रात्रौ 11 वाजता मुंबई-दापोली या मार्गावर 1 बस, स. 6.30 दापोली जलद रत्नागिरी दु. 12.30 रत्नागिरी-दापोली, सायंकाळी 4 वाजता दापोली-चिपळूण, सायं. 6.15 वाजता चिपळूण-दापोली या मार्गावर 1 बस, स. 10 वाजता दापोली-मंडणगड-भाईदर व रा. 9.30 वाजता

भाईंदर-खेड-दापोली या मार्गावर 1 बस, रात्रौ. 9.30 वाजता दापोली-खेड-भाईंदर व सकाळी 6 वाजता भाईंदर मंडणगड दापोली या मार्गावर 1 बस, स. 9.30 वाजता दाभोळ -मुंबई व रात्रौ 8.30 वाजता मुंबई-दाभोळ या मार्गावर 1 बस, रात्रौ. 9.45 दाभोळ -मुंबई व स. 6.30 ची मुंबई-दाभोळ या मार्गावर 1 बस अशा 8 बसेस देण्यात आल्या असून प्रवाशांचा या बसना चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *