Breaking News
खेड : भोस्ते घाटात कारला कंटेनरची पाठीमागून जोरदार धडक, कार महामार्गावरून खाली, कारचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली चिपळूण : कटरे येथे वादातून शेतकऱ्याला मारहाण, लाकडी दांडक्याच्या प्रहारात कानाला दुखापत, लाथ मारून ढकलले, त्यानंतर दांडक्याने हल्ला, वैभव शिर्केविरोधात सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल राजापूर : 28 वर्षीय तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, पत्नीला बाहेर जाऊन येतो सांगून घरातून पडला बाहेर दापोली : आंजर्लेच्या खाडीत रेती माफियांचा रात्रीस खेळ! आंजर्लेच्या खाडीत रात्रभर रेती उपसा, तरीबंदर ते गणेश गल्लीपर्यंत रेती उपशाच्या तक्रारी समोर, महसूल विभागाचे दुर्लक्ष? चिपळूण : तालुक्यात दोन घरफोड्या; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 4 लाख 26 हजारांचा मुद्देमाल चोरीला

चिपळुण : तरुणावर अज्ञातांकडून हल्ला

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील अलोरे येथून घरी जात असलेल्या एका तरुणावर दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञातांनी दुपारी 1.30 च्या सुमारास हॉकिस्टीकने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

ही घटना सोमवारी दुपारी घडली. यात तरुण जखमी झाला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञातांवर अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतची फिर्याद संदीप राजाराम जाधव (37, अलोरे) यांनी दिली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप जाधव याचे अलोरे बाजारपेठे येथे पान टपरीचे दुकान आहे. सोमवारी दुपारी 1.30च्या सुमारास ते दुकान बंद करुन अलोरे मैदानाच्या बाजूच्या रस्त्याने आलोरे-बौध्दवाडी येथे घरी जेवण्यासाठी जात होते. असे असताना एका काळया रंगाच्या दुचाकीवरुन दोन व्यक्ती संदीपच्या मागून आल्या व त्यांनी त्याच्या उजव्या पायावर हॉकीस्टीकने जोरात प्रहार केला. यात तो जखमी झाला.

भरदुपारी झालेल्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. संदीप याने दिलेल्या फिर्यादीनुसार, अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची गंभीर दखत घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांनी त्या अज्ञातांचा शोध सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *