संगमेश्वर : शाळकरी मुलींशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाची 50 हजारांच्या जामिनावर सुटका

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथे शाळकरी मुलींशी गैरवर्तन करणाऱ्या संजय मुळ्ये या शिक्षकाची न्यायालयाने 50 हजारांच्या जामिनावर सुटका केली आहे. त्याला जामीन देताना कोर्टाने काही अटी घातल्या आहेत.

कोर्टाच्या परवानगीशिवाय शाळेत जावू नये, पीडित मुलींना भेटू नये, पीडित मुलींना भेटण्याचा प्रयत्न करू नये, असे कोर्टाने सांगितले आहे. रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला 20 डिसेंबर रोजी जामीन मंजूर केला. घटना अशी की, तालुक्यातील प्राथमिक शाळेत पाचवी, सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींसोबत शिक्षक हा अश्लील चाळे करायचा.

शेवटी कंटाळून या मुलींनी घरी सारा प्रकार सांगितला. संतप्त झालेल्या पालकांनी तातडीची पालक सभा लावली. ग्रामस्थांनी सायंकाळी शाळेवर धडक दिली. शिक्षकाला जाब विचारला. वातावरण चिघळताच पोलिसांना याची माहिती देण्यात आली. प्रकरण गंभीर असल्याने डिवायएसपीसह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

त्यांनी जमावाला शांत करत शिक्षकाला ताब्यात घेतले. त्याच्यावर पिक्सो अंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला होता. न्यायालयाने त्याला प्रथम पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर संजय मुळ्ये हा न्यायालयीन कोठडीत होता. चार महिन्यांनंतर त्याने कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता.

रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयात त्याने 20 डिसेंबर जामीन अर्ज केल्यानंतर नायालयाने त्याला पीडित मुलींना भेटू नये, अगर भेटण्याचा प्रयत्न करू नये अशा अटी घातल्या होत्या. या अटींवर न्यायालयाने 50 हजाराचा जामीन मंजूर करत सुटका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *