तालुक्यातील अडूर गावातील बौध्द विहारमध्ये जयंती व महापरिनिर्वाण दिनी जाण्यास पोलिस निरीक्षक यांनी मज्जाव केल्याने त्यांची बदली करण्याची मागणी तेथील बौद्ध बांधवांकडून होत आहे.
या मागणीसाठी बौद्ध ग्रामस्थ गेली दोन दिवसांपासून गुहागर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडून उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाला सोमवारी २७ जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी भेट घेऊन उपोषणकर्त्यांच्या भावना जाणून घेत जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांच्यासमोर उपोषणकर्त्यानी घडलेला सर्व प्रकार कथन केला. ग्रामस्थांची भावना समजून घेतल्यानंतर त्यांनी केलेल्या मागणीसंदर्भात अण्णा जाधव यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्याशी उपोषणस्थळावरून थेट संपर्क साधून चर्चा केली.
त्यानंतर गुहागर तहसीलदार यांची देखील भेट घेत ग्रामस्थांचे म्हणणे आपल्या चर्चेतून मांडून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले. दरम्यान पोलीस ठाण्यात दाखल झालेले चिपळूण उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्याशी संवाद साधला. मुळात हा प्रश्न दोघांचा असला तरीही सुद्धा जबाबदार अधिकाऱ्यांनी संयम ठेवून बोलावं लागते, कारण आपल्या अधिकारपदावरील खुर्चीवर बसलेले असता, आपल्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो.
म्हणून आपण समजून घेऊन वागले पाहिजे. परंतु जे काही पोलीस अधिकाऱ्यांकडून काही शब्द तोंडून निघाले असतील पण त्यावेळी दिलगिरी व्यक्त करून हा विषय संपुष्टात आणला असता तर ही वेळ आली नसती, त्यामुळे पोलीस अधीक्षक यांना उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामस्थांचे म्हणणं मांडू दे अशी विनंती केल्याचे यावेळी बोलताना जाधव यांनी बौद्ध ग्रामस्थांना सांगितले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे बौद्ध ग्रामस्थांनी छेडलेल्या उपोषणाला वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी उत्तर जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले आहे. यावेळी संतोष पवार, विनोद पवार, सुदेश कांबळे, शरद जाधव संदेश मोहिते, नारायण मोहिते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















