विजापूर गुहागर महामार्गाने चिपळूणकडे येणाऱ्या बुलेटस्वाराने दुसऱ्या दुचाकीला विरूध्द दिशेला जावून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ३ जण जखमी झाल्याची घटना २१ जानेवारी रोजी घडली.
या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात बुलेट स्वार राहुल रामचंद्र जाधव (३५, पिंपळी खुर्द, चिपळूण, मूळ सांगली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील प्रदीप शंकर मोहिते (४९, कोळकेवाडी, चिपळूण), अधिक रामचंद्र बुधे (मूळ सांगली) हे जखमी झाले होते. तसेच बुलेटस्वार राहुल जाधवही जखमी झाला होता.
याबाबतची फिर्याद प्रदीप मोहिते यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार बुलेटस्वार राहुल रामचंद्र जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















