Breaking News
रत्नागिरी : बँकेच्या ताब्यातील सीलबंद फ्लॅटचे कुलूप तोडून बेकायदेशीर ताबा, दाम्पत्याविरुद्ध गुन्हा चिपळूण : लोटे एमआयडीसीतील प्रदूषण पुन्हा ऐरणीवर; सोनगावात पिवळे रसायनमिश्रित पाणी सोडल्याचा आरोप, ग्रामस्थ, मच्छीमार संतप्त चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाची विभा अरविंद ग्रंथालयाला सदिच्छा भेट, वाचन चळवळ बळकट करण्याचा निर्धार दापोली : भाटघरमध्ये शेतकरी जागृती; ‘उपयुक्त किडी’ जपा, रासायनिक फवारणी टाळा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ‘कृषीकन्या’ गटाचा पुढाकार मंडणगडमध्ये बेपत्ता व्यक्तीचा जंगलात सांगाडा, गळफासासाठी वापरलेला फासही आढळला 2 महिन्यांनंतर उलगडले गूढ

खेड : डम्परची दुचाकीला धडक, दोघे जखमी

banner 468x60

खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील नांदगाव-मोहल्लानजीक डम्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी झाले.

banner 728x90

या प्रकरणी रोहित हरी जाधव (19, रा. चिंचघर -दस्तुरी) याच्यावर शुक्रवारी रात्री उशिरा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.अमीर इलियास खान (20), अक्सा मोहतसीम खडस (25, दोघे रा. डाकबंगला, मूळगाव बहिरवली- चौगुले मोहल्ला) अशी जखमींची नावे आहेत.

अक्सा खडस ही एम.एच.08/बी.ए. 9385 क्रमांकाच्या दुचाकीवरून अमीर खान याच्यासमवेत डाकबंगला येथून बहिरवलीकडे जात असताना समोरून येणाऱ्या एम.एच.08/डब्ल्यू 8258 क्रमांकाच्या डम्परने धडक दिली. अपघातात दोघांनाही दुखापती झाल्या असून दुचाकीचे नुकसान झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *