रत्नागिरी : आईच्या निधनाच्या धक्क्याने 24 वर्षीय तरुणीचा मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी तालुक्यातील जयगड कांबळेलावगण येथे आईच्या निधनाचा धक्क्याने तरुणीचा मृत्यू झाला. प्रियंका रवीकांत मालप (२४, रा. कांबळेलावगण मालपवाडी) असे मृत तरुणीचे नाव आहे. ही घटना २२ जानेवारी रोजी रात्री ९ च्या सुमारास घडली, अशी नोंद जयगड पोलिसात करण्यात आली आहे.

banner 728x90 banner 728x90

रियंकाची आई रुचिका मालप हिचे जानेवारी २०२४ मध्ये मेंदुमध्ये रक्तस्त्राव झाल्याने निधन झाले. या घटनेचा प्रियंकाला धक्का बसल्याने ती तणावात होती.

वेळेवर जेवण घेत नसल्याने तिला अशक्तपणा आला होता. यंदा १९ जानेवारी रोजी आईचे वर्षश्राद्ध झाल्यानंतर तिने जेवण सोडून दिले होते. घरातल्या मंडळींनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला.

मात्र प्रियंका स्वतःला मानसिक धक्क्यातून सावरु शकली नाही. २२ जानेवारी रोजी तिला अत्यवस्थ वाटू लागले. त्यावेळी नातेवाईकांनी तिला उपचारासाठी खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता प्रियंकाला मृत घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *