रत्नागिरीत दोन महिन्यांपूर्वी शहरातील एकाची तब्बल 61 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली होती. ही फसवणूक करणाऱ्या या दोघांना सायबर क्राईमच्या पथकाने हैदराबादमधून अटक केली.
रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांची रवानगी 4 दिवसांच्या पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. निवास पेदेचा मुडीकोंडा आणि उदय लक्ष्मण दोरापल्ली (दोन्ही रा. देवारकोंडा, हैदराबाद) अशी अटक केलेल्या दोन संशयितांची नावे आहेत.
त्यांच्याविरोधात फिर्यादीने रत्नागिरी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, दोन महिन्यांपूर्वी संशयितांनी फिर्यादीशी संपर्क साधून फॉरेस्टमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून चांगल्या परताव्याचे आमिष दाखवले होते. त्यांच्या या आमिषाला बळी पडून फिर्यादीने तब्बल 61 लाखांची गुंतवणूक केली होती.
परंतु, त्यानंतर फिर्यादीला कोणताही परतावा तसेच मूळ रक्कम परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी रत्नागिरी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. या प्रकरणी तपास करताना सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयित हे हैदराबादला असल्याचे धागेदोरे मिळाले.
आरोपींना पकडण्याची कामगिरी सायबर क्राईमच्या पोलिस निरीक्षक स्मिता सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पुरळकर, पोलिस हेड काँस्टेबल सौरभ कदम, अजिंक्य ढमढेरे यांनी केली.
हैदराबाद येथेही एक गुन्हा तक्रारीनुसार, सायबर क्राईमच्या पथकाने हैदराबाद येथे जाऊन या दोन्ही संशयितांची मुसक्या आवळल्या. त्यांच्यावर हैदराबाद येथेही एक गुन्हा दाखल आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















