दाभोळ : प्रवाशाच्या कानशिलात मारून शिवीगाळ केलेली महिला कंडक्टर निलंबित

banner 468x60

एसटी बसमधील प्रवाशाच्या कानशिलात मारून त्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी दापोली आगारातील परजिल्ह्यातील महिला वाहकाला प्रशासनाने निलंबित केले आहे. हा प्रकार शनिवारी (ता. ७) दुपारी दापोली-दाभोळ मार्गावर घडला होता. त्याची दखल घेत एसटी प्रशासनाने ही कारवाई केली.


शनिवारी दुपारी २.३० वाजता दापोली-दाभोळ बस दाभोळकडे रवाना झाली. ही बस चिखलगावजवळ आली असता एका प्रवाशाने शंभर रुपये महिला वाहकाला तिकीट काढण्यास दिले. महिला वाहकाने त्यांना उर्वरित सुट्टे पैसे नंतर घ्या, असे सांगितले.

वाहकाच्या सूचनेचे पालन करत तो प्रवासी जागेवर जाऊन बसला. त्यानंतर महिला वाहक चालकाच्या केबिनमध्ये बसली. पुढील थांब्यावर एक वयोवृद्ध नागरिक एसटीत चढला. त्यावेळी महिला वाहकाने चालकाच्या केबिनमधूनच त्या वृद्धाला इकडे येऊन तिकीट घ्या, असे फर्मान सोडले. त्यावर एका प्रवाशाने त्या वाहकाला केबिनमध्ये जाऊन तुमचे हे वागणे बरोबर नाही, असे सांगितले.

तुम्ही वयोवृद्ध नागरिकाजवळ जाऊन त्याचे तिकीट काढायला पाहिजे. याचा राग येऊन त्या महिला वाहकाने या प्रवाशाच्या कानशिलात मारली आणि शिवीगाळही केली.
हे प्रकरण दाभोळ पोलिस ठाण्यापर्यंत गेले. दाभोळ पोलिस ठाण्यात त्या प्रवाशाची तक्रार लिहून घेत महिला वाहकाला समजही दिली गेली.

या प्रकाराची दापोली एसटी आगाराने दखल घेतली असून, त्या महिला वाहकाच्या यापूर्वीही तक्रारी आलेल्या असल्यामुळे निलंबित केले आहे. याला एसटी आगारातील अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *