सर्वच राजकीय पक्ष वारंवार बैठका, पत्रकार परिषद घेत असून राजकीय वर्तुळात अनेक नवनवीन घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रत्नागिरीमध्ये मोठा धक्का बसला आहे.
भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला असून आज दुपारी मातोश्रीवर बाळ माने यांचा पक्ष प्रवेश झाला आहे.
बाळ माने यांनी भाजपा पक्ष सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत आज प्रवेश केला असून आज त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
त्यावेळी बाळ माने यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी असलेला एबी फॉर्म देण्यात आला. महायुती तर्फे उदय सामंत यांना रत्नागिरीमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून निवडणूक लढवणारे पालकमंत्री उदय सामंत आणि बाळ माने यांच्यात काटे की टक्कर अशी लढत होणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















