चिपळूण-संगमेश्वर विधानसभा 2024 : विद्यमान आमदार शेखर निकम यांना पक्षाकडून AB फॉर्म

banner 468x60

राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यावर आता सर्वच नेत्यांना उमेदवारीचे तिकीट मिळण्याचे वेध लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आजी-माजी आमदार विधानसभेच्या पुन्हा मैदानात आहे.

विद्यमान आमदार शेखर निकम यांना पक्षाकडून AB फॉर्म देण्यात आला आहे. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांना पक्षाने Ab फॉर्म दिला आहे.

कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसला एकमेव विजय मिळवून देणाऱ्या चिपळूण विधानसभा मतदारसंघात यावेळी राष्ट्रवादी (अजित पवार गट) विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार गट) अशी लढत होईल हे जवळपास निश्चित झाले आहे.

त्यामुळे कोकणातील राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हा सामना कोण जिंकतयं याकडे तमाम महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पक्षाचे दोन भाग झाल्याने दोन्ही गटांना मित्रपक्षांची गरज लागणार आहे.

आता महायुती आणि महाविकास आघाडीतील हे घटकपक्ष काय भूमिका घेणार, यावर चिपळूणचा निकाल ठरणार आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *