Breaking News
संपूर्ण दापोली अंधारात! सकाळी 10 पासून वीज गायब, रात्री 8 वाजेपर्यंतही पुरवठा पूर्ववत नाहीदिवसभर वीज नसल्याने नागरिकांचे हाल, महावितरणच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी रत्नागिरी-कुवारबाव मार्गावर ग्रेडरच्या चाकाखाली सापडून सायकलस्वाराचा जागीच मृत्यू दापोलीच्या ‘वाईल्ड ॲनिमल रेस्क्यूअर अँड रिसर्च’ संस्थेला राज्यस्तरीय आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार खेडमध्ये भरदिवसा घरफोडी, सोन्याचे दागिने, रोख रकमेसह 1 लाख 42 हजारांचा मुद्देमाल चोरीला मंडणगड : उबाठा गटासह राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार, अनेक ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेशदेव्हारेचे माजी सरपंच अमृत बर्जे यांच्यासह वडवली ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

संगमेश्वर : सिलेंडर गळतीने लागलेल्या आगीत प्रौढाचा मृत्यू

banner 468x60

संगमेश्वर गणेशोत्सवात विघ्नाची वार्ता समोर आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील शेंबवणे गोमानेवाडी येथे सिलेंडर गळतीने भाजलेल्या एका प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवार 7 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली.

बाळू सोमा बांबाडे (55, गोमानेवाडी, संगमेश्वर) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. या घटनेने ऐन गणेशोत्सवात बांबाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सविसर वृत्त असे की, शेंबवणे गोमानेवाडी येथील बाळू बांबाडे हे सकाळी 8.30 वाजता घरात गणेश मूर्तीची पूजा करत होते.

यावेळी त्यांच्या पत्नीने सारवण करताना त्यांना हाक मारली. गॅस बाजूला करण्यास सांगितले. यावेळी गॅस लिकेज झाला. त्यावेळी सिलेंडरचा भडका उडून गंभीर जखमी झाले. त्यात ते 90 टक्के भाजले.

घटनेची माहिती आजूबाजूला कळताच त्यांना ग्रामस्थांनी लगेच संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची स्थिती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तिथे उपचार सुरू असताना सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने ऐन गणेशोत्सवात दुर्घटना घडल्याने परिसरात दुःख व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *