लांजा : तालुक्यात होतोय वारंवार वीजपुरवठा खंडित, विजेचा खेळखंडोबा

banner 468x60

तालुक्यातील ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. या विरोधात आमदार राजन साळवी यांनी शिवसैनिकांसह महावितरण कार्यालयावर धडक दिली. या वेळी शिवसैनिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

शुक्रवारपर्यंत नागरिकांच्या तक्रारी न सोडवल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करू, असा इशारा दिला. महावितरण कंपनीकडून पावसाळ्यापूर्वीची कामे करणे अपेक्षित होते. ती न केल्यामुळे गेले काही दिवस तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत.

याबाबत दिलेल्या तक्रारींची दखल वेळेत घेतली जात नाही. बारा ते पंधरा तास वीजपुरवठा खंडित राहिल्यामुळे लांजावासियांनी हा प्रश्न उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांपुढे मांडला. आमदार साळवी यांनी त्याची दखल घेत लांजा महावितरण कार्यालयावर धडक दिली.

शिवसैनिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांपुढे समस्यांचा पाढाच वाचला. या समस्या तत्काळ सोडवल्या पाहिजेत, अशी सूचनाही केली. या वेळी उपअभियंता दयानंद अष्टेकार यांनी लोकांच्या समस्या त्वरित सोडवण्यासाठी नीलेश कुलकर्णी यांची नोडल ऑफिसर म्हणून तातडीने नेमणूक केली तसेच लांजा शहरात रात्रीसाठी अतिरिक्त १ वायरमन नियुक्त करण्यात येत असल्याचे सांगितले

तसेच तालुक्यातील पूर्व विभागातील गावांसाठी एकत्रित एक नवीन फिडर तळवडे रेल्वेस्टेशन ते आडवली या नवीन लाईन लवकरच तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *