तालुक्यातील २८ शाळांपैकी २६ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर श्रीदेव गो. कृ. मा. वि. मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर शाळेतील चारूता आठवले या विद्यार्थिनीने ९९.६० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम तर पालशेतच्या यश आग्रेने ९९ टक्के मिळवत द्वितीय आणि विवेना पटेकरने ९८ टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
श्रीदेव मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर शाळेचा १०० टक्के निकाल लागला आहे. त्यात चारुता आठवले ९९.६०, अथर्व विचारे ९६.८०, श्यामसुंदर गुट्टे ९२.६० यांनी अव्वल यश मिळवले. श्रीमती आर. पी पालशेतकर माध्यमिक विद्यालय पालशेतमधील ८८ मुलं उत्तीर्ण झाली असून त्या शाळेचा निकाल ९८.८७ टक्के लागला.
त्यामध्ये यश आग्रे ९९, विवेना पटेकर ९८, निकिता जोशी ९६.८० टक्के गुण मिळवले. न्यू इंग्लिश स्कूल पाटपन्हाळेतील ११९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वेदांत गुरव ९३.४०, रिया विचारे ९२.८०, तन्वी गावडे ९२ टक्के गुण मिळवले. हेदवकर विद्यानिकेतनमधील युक्ता हळदणकर ९३.४०, आर्या पागडे ९२ टक्के, रिया पवार ९१.६० यांनी यश मिळवले. सरस्वती विद्यामंदिर जामसूत शाळेतील २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आबलोली या शाळेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात सिद्धि पागडे.९१.६०, अर्णव हिवाळे ८८.२०, जान्हवी तटकरे ८५.६० टक्के गुण मिळाले. न्यू इंग्लिश स्कूल तळवली या शाळेतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















