दापोली : होर्डिंगचे सर्वेक्षण सुरु

banner 468x60

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सर्वच महानगर पालिका व नगर पंचायत यांनी शहरांमध्ये असणाऱ्या मोठ्या होर्डिंगवर कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे.

त्यातच दापोली नगर पंचायतीनेही शहरातील होर्डिंगचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. या अनधिकृत होर्डिंगबाबत नोटीस बजावून कारवाई करण्यात येणार असल्याचेही दापोली नगर पंचायतीकडून सांगण्यात आले.

२ ते ३ दिवसात हे सर्वेक्षण पूर्ण करून या होर्डिंगधारकांना नोटीस बजाविण्यात येणार आहे. नोटीसनं तर होर्डिंगधारकांनी कार्यवाही न केल्यास कारवाई होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *