Breaking News
रत्नागिरी : स्वच्छ सर्वेक्षणात रत्नागिरीचा देशात डंका, देशात पटकावला तिसरा क्रमांक, स्वच्छतेच्या राष्ट्रीय स्पर्धेत रत्नागिरीची दमदार कामगिरी रत्नागिरी : स्वप्नाली सावंत हत्या प्रकरणात पती सुकांतसह नोकराचा जामीन अर्ज फेटाळला; रत्नागिरी सत्र न्यायालयाचा निर्णय, चार वर्षांहून अधिक काळ कारागृहात चिपळूण : रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूस पार्किंग व्यवस्था करा, शौकतभाई मुकादम यांची मागणी मंडणगडच्या दोन शाळकरी मुलींची भरारी थेट अमेरिकेत! गोठे आणि वेसवीच्या अपेक्षा-मानस करणार अंतराळ संशोधन केंद्राला भेट, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची सातासमुद्रापार झेप संगमेश्वर : देवरुखजवळ बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास, सोन्याचे दागिने आणि 1.70 लाखांची रोकड चोरी

दापोली : रामराजे इंटरनॅशनल स्कूलचा 100% निकाल, ओवेस नागोठणे 92 % मार्क्स मिळवत प्रथम, स्वराज मुरुडकर द्वितीय

banner 468x60

सीबीएससी बोर्ड अंतर्गत दहावीच्या परीक्षेचा ब्रिलियंट करिअर अकॅडमी संचलित रामराजे इंटरनॅशनल स्कूलचा शंभर टक्के निकाल लागला असून या शाळेतील ओवेस नागोठणे याने 92 % मार्क्स मिळवत शाळेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे,

तसेच स्वराज मुरुडकर याने 90% मार्क्स मिळवत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. शिस्तबद्ध अभ्यासाचे नियोजन, प्रचंड मेहनत आणि ध्येय दृष्टीने केलेला अभ्यास यामुळेच हे यश मिळाले असे मत ओवेस नागोठणे यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेनुसार यश मिळाले पाहिजे यासाठी शाळा कटिबद्ध असून शिक्षकांकडून विद्यार्थ्यांसाठी अतोनात मेहनत घेतली जाते. इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेगळे पॅटर्न शाळेने तयार केले असून त्याचीच प्रचिती ही निकालामध्ये प्राप्त झाली आहे.

या यशामध्ये पालकांचा,शिक्षकांचा आणि शाळा प्रशासनाचा महत्त्वाचा वाटा आहे. या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे संचालक संदीप राजपुरे,संदीप खोचरे,संदीप सावंत आणि डॉक्टर उमेश वैशंपायन यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *