Breaking News
गुहागर : भातगाव येथील 55 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू खेड : परशुराम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक स्तन कर्करोग तपासणी यंत्राचे उद्घाटन; महिलांसाठी विशेष आरोग्य उपक्रम महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा

गुहागर : घरकूल योजनेचा दुसरा हप्त्या मिळेना, महिला झिजवतेय उंबरठे, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

banner 468x60

गुहागर तालुक्यातील कोतळूक गावातील निराधार महिला लक्ष्मी पांडुरंग गोरिवले यांना घरकूल योजनेतून घर मंजूर झाल्याचे पत्र ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आले.

banner 728x90 banner 728x90

घरकूल मंजुरीनंतरचा पहिला हप्ता १५ हजार रुपये त्यांना देण्यात आला. त्यानंतर त्यांनी घराचे काम सुरू केले. जोत्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता ४५ हजार रुपये मिळेल, या आशेने त्यांनी जोत्याचे बांधकाम पूर्ण केले.

अनेकदा सरपंच व ग्रामसेवक, पंचायत समितीतील अधिकाऱ्यांना भेटून दुसरा हप्ता मिळावा, अशी मागणी केली; मात्र अद्याप त्यांना तो मिळालेला नाही. अखेर या निराधार महिलेने दुसरे राहते घर नसल्याने दुसऱ्याकडून उसने पैसे घेऊन घराचे बहुतांश काम पूर्ण केले.

दुसऱ्या हप्त्यासाठी गेला महिनाभर ग्रामपंचायत व पंचायत समितीचे उंबरठे ते झिजवत आहेत. ग्रामीण भागातील गरीब व बेघर लोकांसाठी आवास योजना सुरू झाली. या योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात अनेक लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूरही झाले. त्यानंतर दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर पहिला हप्ता १५ हजार रुपये मिळाला;

मात्र दुसऱ्या हप्त्याची घरकूलधारकांना अजूनही प्रतीक्षाच असून, ही योजना म्हणजे लोकांना गाजर दाखवणे अशी स्थिती दिसून येत आहे. यावर्षी २०२३-२४ या वर्षात तालुक्यात ६१५ घरांना मंजुरी देण्यात आली. त्यातील ६०६ घरांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. त्यातील ९ घरांना तांत्रिक कारणास्तव पहिला हप्ता देण्यात आला नाही.

तालुक्यात २८ अपंग तर ५८७ ओबीसींसाठी घरकुलांचे प्रस्ताव मंजूर आहेत. मार्चअखेर ही कामे पूर्ण होणे अपेक्षित आहेत; मात्र मोदी आवास योजनेच्या लाभार्थ्यांना दुसरा हप्ता न मिळाल्याने सर्वच लाभार्थ्यांना घरघर लागली आहे. गुहागर पंचायत समितीकडून दुसऱ्या हप्त्याच्या मागणीबाबत जिल्हा प्रशासनाकडे पत्रव्यवहारही केला होता;

मात्र पुढील सूचना येईपर्यंत हप्ता सोडू नये, असा मेसेज वरिष्ठांकडून देण्यात आला, अशी माहिती पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

घरकुलासाठी चार टप्प्यात रक्कम
या योजनेतून होणाऱ्या घरकुलासाठी प्रत्येक लाभार्थ्याला एकूण १ लाख २० हजार मंजूर आहेत. यापैकी पहिला हप्ता १५ हजाराचा असतो. दुसरा हप्ता ४५ हजार रुपये जोत्याचे काम पूर्ण झाल्यावर, तिसरा हप्ता लेवल पूर्ण झाल्यानंतर ४० हजार रुपये, चौथा हप्ता शौचालयासह घरकूल पूर्ण झाल्यानंतर २० हजार रुपये मिळतात.

मोबाईलवर अशापद्धतीने चेक करा तुमच्या गावातील घरकुल यादी

1- सर्वात आधी तुम्हाला https://pmayg.nic.in/netiayhome/home.aspx लिंक वर क्लिक करावे लागेल.

2- नंतर सर्वात आधी तुम्हाला मेन मेनू वर क्लिक करून Awassoft यावर क्लिक करणे गरजेचे आहे.
3- यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे रिपोर्ट असा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करावे.
4- नंतर तुम्हाला त्या ठिकाणी काही आवश्यक माहिती भरणे गरजेचे आहे ती माहिती व्यवस्थित भरून घ्यावी.

5- माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तुम्ही ऑल स्टेट या ठिकाणी राज्याची निवड करायची आहे व राज्याची निवड केल्यानंतर तुम्ही राहत असलेल्या जिल्हा व तालुका निवडावा. यानंतर तुमच्या गावाची निवड करावी व सर्व माहिती अचूक पद्धतीने नमूद करावी.
6- त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला एक द आन्सर इज हा पर्याय दिसेल त्या पर्यायामध्ये विचारलेली सगळी माहिती अचूक भरावी. या ठिकाणची माहिती अचूक भरणे खूप गरजेचे आहे. याच ठिकाणी बरेच जण चुकतात.
7- संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करावे.
8- जेव्हा तुम्ही ही प्रोसेस करत आहात तेव्हा जर तुमच्या गावांमध्ये घरकुले मंजूर झाले असतील तर मंजूर झालेल्या सर्व घरकुल लाभार्थ्यांची नावे तुम्हाला या ठिकाणी दिसतील.
9- या यादीची पीडीएफ फाईल डाऊनलोड देखील तुम्ही या ठिकाणी करू शकतात.
10- अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही एका मिनिटांमध्ये मोबाईल मधून घरकुल योजना नवीन यादी पाहू शकता व ती डाउनलोड देखील करू शकतात.

लाभार्थी यादी कशी पाहायची?
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला http://pmay.nic.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर Pradhan Mantri Awaas Yojana – Gramin नावानं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. Pradhan Mantri awaas Yojana- Gramin, Guidelines आणि Cirulars असे तीन पर्याय तुम्हाला तिथं दिसतील.
यापैकी पहिल्या म्हणजेच Pradhan Mantri awaas Yojana- Gramin या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
यानंतर तुमच्यासमोर प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणची वेबसाईट ओपन होईल.
यामध्ये तुम्हाला ग्रामीण विकास मंत्रालयाचं किती घरकुलांचं उद्दिष्ट आहे, त्यासाठी किती जणांनी नोंदणी केली आहे, त्यापैकी किती प्रस्ताव मंजूर झाले आहेत, त्यापैकी किती घरकुलांची कामं पूर्ण झाली आहेत आणि त्यासाठी किती कोटी रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे, याची माहिती दिसेल.
आता तुम्ही घरकुलासाठी अर्ज केला असेल तर ते मंजूर झालं की नाही ते कसं पाहायचं त्याची माहिती पाहूया.

यासाठी तुम्हाला वरच्या बाजूला असलेल्या Awaassoft या पर्यायावर क्लिक करायचं आहे. यातील दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय आहे report. यावर क्लिक केलं की एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. इथं वेगवेगळे रिपोर्ट दिलेले तुम्हाला दिसून येतील. त्यातील सगळ्यात शेवटच्या Social Audit Reports मधील Beneficiary details for verification यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुमच्यासमोर MIS Report नावाचं एक पेज ओपन होईल. यापेजवर selection filters या पर्यायाखालील एक एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. Filters
सुरुवातीला राज्य, त्यानंतर जिल्हा, मग तालुका आणि सगळ्यात शेवटी गाव निवडायचं आहे. हे निवडून झालं की मग तुम्हाला कोणत्या वर्षीची यादी पाहायची आहे ते वर्ष निवडायचं आहे.
आता आपल्याला 2020-21 या वर्षातील लाभार्थ्यांची यादी पाहायची आहे त्यामुळे आपण 2020-21 हे वर्ष निवडलं आहे.
त्यानंतर कोणत्या योजनेतील घरकुल लाभार्थ्यांची यादी पाहायची आहे ती योजना निवडायची आहे.
इथं तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण, All central schemes, All states schemes, राजीव गांधी आवास योजना, मुख्यमंत्री आवास योजना…अशा दिलेल्या योजनांपैकी योग्य तो पर्याय निवडायचा आहे.

आता आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण या योजनेतील यादी पाहायची असल्यानं आपण ती योजना निवडली आहे.
त्यानंतर समोर दिलेल्या बेरीज किंवा वजाबाकीच्या प्रश्नाचं उत्तर कॅप्चाच्या रकान्यात टाकायचं आहे.
आणि मग सगळ्यात शेवटी सबमिट या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्यांची यादी ओपन होईल.
याप्रकारे तुम्ही तुमच्या गावातील कोणत्या योजनेअंतर्गत कुणाला घरकुल मंजूर करण्यात आलं, याची माहिती पाहू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *