खेड तालुक्यात सुमारगडाच्या पायथ्याशी वसलेली मौजे जैतापूर गावातील पायरीचामाळ धनगरवाडी मात्र स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही रस्त्याच्या मुलभूत सुविधांसाठी शासन दरबारी संघर्ष करत आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकही धनगरवाडी रस्त्याच्या मुलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही, असे जाहीर सभांमध्ये वारंवार विधान केले होते.
, आमदारकीची टर्म संपत आली तरी स्थानिक लोकप्रतिधींना धनगरवाड्यांचा विसर पडलेला आहे. आजही तालुक्यातील अनेक धनगरवाड्या रस्त्याच्या मुलभूत सुविधांसाठी शासनदरबारी संघर्ष करत आहेत.
पायरीचामाळ धनगरवाडी येथे रस्त्याची सोय नसल्याने आजही रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी डोलिचा वापर करावा लागत आहे.
येथील मुलभूत विकासाकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने धनगर समाजाला कोणी वाली नसल्याचे चित्र खेड तालुक्यात पाहाण्यास मिळत आहे, अशी खंत महाराणी अहिल्यादेवी समाज जिल्हा अध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी व्यक्त केली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















