गुहागर : काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रियाज ठाकूर करणार शिवसेना शिंदे गटात प्रवेश

banner 468x60

येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर राजकीय गणितं बदलताना पाहायला मिळत आहेत.

गुहागर तालुका काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष ग्रामपंचायत पाटपन्हाळेचे सदस्य रियाज ठाकूर हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

रामदास कदम ९ मार्च रोजी आज सायंकाळी ५:०० वाजता श्रृंगारतळीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. याचवेळी रियाज ठाकूर हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

कोकण कट्टा लाईव्हशी बोलताना रियाज ठाकूर यांनी पक्षप्रवेशाची माहिती दिली आहे.

शृंगारतळी येथे आज होणाऱ्या शिवसेना पक्षाच्या सभेत शिवसेना नेते रामदास कदम, यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. याच बरोबर काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश करणार आहेत.


या सभेला उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, रायगड रत्नागिरी चे खासदार सुनील तटकरे हेही उपस्थित राहणार आहेत.आज होणाऱ्या सभेकडे संपूर्ण तालुका वासियांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *