शिवसेना नेते रामदास कदम ९ मार्च रोजी सायंकाळी ५:०० वाजता श्रृंगारतळीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत . यासाठी १० हजार कार्यकर्ते सामावू शकतील याची तयारी सुरू आहे .
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी गुहागरमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली . यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रभाकर शिर्के , तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर , शहर प्रमुख नीलेश मोरे , प्रल्हाद विचारे , नारायण गुरव , खेडचे तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण , अमरदीप परचुरे उपस्थित होते .
गुहागर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मागणीचा सन्मान करून रामदास कदम यांनी ही सभा आयोजित केली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले .
यावेळी अनेक जुनेजाणते कार्यकर्ते , युवा कार्यकर्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत .
या सभेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे , आमदार योगेश कदम , शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे उपस्थित राहणार आहेत . सभा यशस्वी करण्यासाठी गुहागरमध्ये जोरदार तयारी सुरू आहे .

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















