घरगुती वादातून पत्नीच्या हातावर सुरीने वार करणाऱ्या पतीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना मंगळवारी (दि. २७) सायंकाळी परटवणे, सरोदेवाडी येथे घडली.
शंकर दत्ताराम रसाळ असे त्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी गाडीतळ येथे पत्नी घरकाम करण्यासाठी गेलेली असताना पती शंकर रसाळने तिथे जाऊन तिला मारहाण केली. धारदार सुरीने पत्नीच्या डाव्या हातावर वार केले.
या प्रकरणी पत्नीने त्याच्याविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मंगळवारी सायंकाळी घरात कोणी नसताना शंकरने दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवले. थोडया वेळाने कुंटुंबिय घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
या बाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला. या घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















