Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

रत्नागिरी : व्यावसायिकाची १० लाखांची फसवणूक

banner 468x60

वडिलांच्या मित्राची ओळख सांगून त्यांच्या नावे तब्बल १० लाख रुपये मागवून घेत रत्नागिरीतील व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

banner 728x90

या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फसवणुकीची घटना बुधवारी (१६ फेब्रुवारी) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी मुकेश गुंदेचा (रा. खेडशी, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, त्यांच्या वडिलांचे मित्र हसमुख जैन (रा. दापोली) यांच्या सांगण्यावरून त्यांनी प्रकाश धारीवाल (रा. पुणे) यांना १० लाखांची गरज असल्याने दिल्ली येथे दीपक नामक व्यक्तीकडे पैसे मागवून घेतले.

त्याप्रमाणे मुकेश गुंदेचा यांनी पैसे पाठवून दिले. काही कालावधीनंतर हे सर्व पैसे राजापूर येथील नवीन धारीवाल हे फिर्यादींना परत आणून देणार असे ठरले होते.

परंतु, ठरलेल्या मुदतीत पैसे न मिळाल्याने वडिलांचे मित्र हसमुख जैन यांनी प्रकाश धारीवाल यांना दुसऱ्या मोबाइलवर फोन केला. त्यावेळी त्यांनी आपण पैसे मागितलेच नसल्याचे हसमुख जैन यांना सांगितले.

त्यामुळे प्रकाश धारीवाल क नवीन धारीवाल यांच्या नावाचा वापर करून संशयितांनी १० लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले. या प्रकरणी दीपक व अन्य दोन अज्ञात (सर्व रा. चांदणी चौक, दिल्ली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *