Breaking News
रत्नागिरी : स्वच्छ सर्वेक्षणात रत्नागिरीचा देशात डंका, देशात पटकावला तिसरा क्रमांक, स्वच्छतेच्या राष्ट्रीय स्पर्धेत रत्नागिरीची दमदार कामगिरी रत्नागिरी : स्वप्नाली सावंत हत्या प्रकरणात पती सुकांतसह नोकराचा जामीन अर्ज फेटाळला; रत्नागिरी सत्र न्यायालयाचा निर्णय, चार वर्षांहून अधिक काळ कारागृहात चिपळूण : रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूस पार्किंग व्यवस्था करा, शौकतभाई मुकादम यांची मागणी मंडणगडच्या दोन शाळकरी मुलींची भरारी थेट अमेरिकेत! गोठे आणि वेसवीच्या अपेक्षा-मानस करणार अंतराळ संशोधन केंद्राला भेट, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची सातासमुद्रापार झेप संगमेश्वर : देवरुखजवळ बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास, सोन्याचे दागिने आणि 1.70 लाखांची रोकड चोरी

चिपळुण : हॉटेल व्यावसायिकाला 3 लाखाचा गंडा

banner 468x60

हॉटेलसाठी लागणारे साहित्य ऑनलाईन पद्धतीने मागवणाऱ्या व्यावसायिकास सुमारे २ लाख ७० हजार ७३ रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी सांगली येथील तथाकथित श्री बालाजी ट्रेडर्स विरूद्ध येथील पोलिस स्थानकात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.  येथील हॉटेल व्यावसायीक सुनिल जनार्दन बक्षी (६७, तुलसी अपार्टमेट, प्रभातरोड मार्कंडी चिपळूण) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.

बक्षी यांनी २ डिसेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत हॉटेलसाठी लागणारे विविध प्रकारचे साहित्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी एका अॅप द्ववारे सांगली येथील श्री बालाजी ट्रेडर्स याच्याकडे ऑनलाईन पद्धतीने पैसे भरून साहित्याची मागणी केली. त्यासाठी टप्या-टप्प्याने २ लाख ७० हजार ७३ रूपये त्यांच्या खात्यात जमा केले.

परंतू अनेक दिवस उलटूनही श्री बालाजी ट्रेडर्स कडून कोणत्याही प्रकारचा माल किंवा रक्कम परत केलेली नाही. याबाबत तक्रारदार बक्षी यांनी सांगितले की,

संबंधीत श्री बालाजी ट्रेडर्स हे सांगली येथील असल्याचे भासवले जात असले तरी प्रत्यक्षात जागेवर त्यांचे काही अस्तीत्व नाही. तसेच त्यांचा जीएसटी क्रमांक देखील बनावट असल्याचे पुढे येत आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिस अधिक तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *