गुहागर तालुक्यातील चिखली चांदिवडेवाडी येथील कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्षप्रवेश केला या सर्व कार्यकर्त्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी मनसे पक्षात स्वागत केले.
चिखली चांदिवडेवाडी येथे श्री गणेश मंदिरामध्ये पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. चिखली चांदिवडेवाडी ही ४१० लोकंसंख्येची आहे. यामध्ये मुंबई मंडळ, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, युवक मंडळ यांचा समावेश आहे. या सर्वांनी मनसे पक्षामध्ये प्रवेश केला.
या कार्यक्रमाला गुहागर विधानसभा क्षेत्र जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर,तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर ,सह संपर्क अध्यक्ष समीर जोयशी, सुरेंद्र निकम, उप तालुकाध्यक्ष जितेंद्र साळवी, माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश चांदिवडे, मुंढर शाखाध्यक्ष सुजित गांधी ,नितीन साळवी,गुहागर शहराध्यक्ष नवनाथ साखरकर, जानवळे, शाखाध्यक्ष सुशांत कोळंबेकर सुयोग कुंबडे,
रमेश गांधी,प्रसिद्धी माध्यम प्रमुख प्रीतम सुर्वे सचिन गडदे, दोडवली शाखाध्यक्ष सचिन निकम आदी मान्यवरांसह चिखली चांदीवडे वाडीचे अध्यक्ष दत्ताराम चांदिवडे, अशोक गावणकर, सागर चांदिवडे,नरेश पारदले,अनिल गिजे, संजय नितोरे,धनंजय चांदिवडे,धनंजय चांदिवडे,यशवंत चांदिवडे, नारायण चांदिवडे,
सुनिल चांदिवडे,मधुकर चांदिवडे अनिल गिजे,संदिप नितोरे,ओकार नितोरे,स्मिता गिजे ,सुवर्णा चांदिवडे, शर्मिला गावंणंग,सविता चांदिवडे आदींसह ४०० हून अधिक महिला व पुरुष उपस्थित होते.
चिखली चांदिवडेवाडी येथील सर्व ग्रामस्थांची स्वतःची नळपण योजना असून काही घरांना कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत होता हे अडचण ग्रामस्थांनी मनसे तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांना सांगितली.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















