Chiplun चिपळूण : रेल्वे स्थानकावर विक्रेत्याचे बेजबाबदार वर्तन, वडापाववर पाय ठेवुन झोपला

banner 468x60

कोकणात रेल्वे ने प्रवास करताना बहुतांश गाड्या चिपळूण स्थानकावर थांबतात. इथे तुम्हाला विनापरवाना वडापाव विक्रि करणारे अनेक विक्रेते दिसतील.

banner 728x90 banner 728x90

त्यातील काहीजण परप्रांतीय आहेतच!! बरं भारतात कुणीही कुठेही व्यवसाय करावा त्याला बंदी नाही पण तो करण्याच्या पद्धतीवर आक्षेप आहे.


या बातमीबरोबरच्या छायाचित्रात आपण पाहू शकता की तो विक्रेता ज्यावर स्वत:चे आणि ग्राहकाचे पोट भरतो त्या वडापाववर पाय ठेवुन झोपला आहे.

हे छायाचित्र कोंकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे श्री राजा कांबळे यानी समाज माध्यमांवर शेअर केला आहे. त्यानी हे छायाचित्र चिपळूण स्थानकावरील असल्याचेही म्हटले आहे.

बेजबादार विक्रेत्यांवर रेल्वे प्रशासन कारवाई करेल का? विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशाकडून दंड आकारुन मोठी रक्कम वसूल केली जाते.

मग अशा प्रवाशाच्या जीवाशी खेळणाऱ्या विक्रेत्यांच्या परवान्याचे काय? ज्यांच्याकडे परवाना असेल त्याना काही नियमावली आहे का? या प्रश्नाची उत्तरे रेल्वे प्रशासनाने द्यावीत अशी अपेक्षा प्रवासी व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *