Breaking News
खेड : भोस्ते घाटात कारला कंटेनरची पाठीमागून जोरदार धडक, कार महामार्गावरून खाली, कारचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली चिपळूण : कटरे येथे वादातून शेतकऱ्याला मारहाण, लाकडी दांडक्याच्या प्रहारात कानाला दुखापत, लाथ मारून ढकलले, त्यानंतर दांडक्याने हल्ला, वैभव शिर्केविरोधात सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल राजापूर : 28 वर्षीय तरुण बेपत्ता, अपहरणाचा संशय, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल, पत्नीला बाहेर जाऊन येतो सांगून घरातून पडला बाहेर दापोली : आंजर्लेच्या खाडीत रेती माफियांचा रात्रीस खेळ! आंजर्लेच्या खाडीत रात्रभर रेती उपसा, तरीबंदर ते गणेश गल्लीपर्यंत रेती उपशाच्या तक्रारी समोर, महसूल विभागाचे दुर्लक्ष? चिपळूण : तालुक्यात दोन घरफोड्या; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 4 लाख 26 हजारांचा मुद्देमाल चोरीला

रत्नागिरी : 12 ट्रेकर्सनी तब्बल साडेबारा हजार फूट उंचीवरील ‘केदारकंठ’ शिखर केलं सर

banner 468x60

काही ठिकाणी उणे १० अंश सेल्सिअस, काही ठिकाणी १२ अंश सेल्सिअस, तर काही ठिकाणी १६ अंश सेल्सिअस तापमान अशा प्रतिकूल परिस्थितीत रत्नागिरीतील जिद्दी माउंटनिअरिंग रत्‍नागिरी असोसिएशनच्‍या १२ ट्रेकर्सनी (Trekkers) तीन दिवसांचे ट्रेकिंग करत हिमालय पर्वतरांगातील (Himalaya Mountains) सुमारे १२ हजार ५०० फूट उंचीवरील केदारकंठ शिखर जिद्दीने सर केले.

यामध्ये ट्रेन, बसच्या प्रवासाबरोबरच डेहरादून ते संकरा व्हिलेज असा टेम्पो ट्रॅव्हल्सने केलेला प्रवास, प्रतिकूल हवामानाशी जुळवून घेण्यामध्ये आणि ट्रेकिंगला जाण्यापूर्वी केलेला नियमित सराव महत्त्‍वपूर्ण ठरल्याची माहिती ट्रेकर्स शामसुंदर शेट्ये यांनी दिली.

या ट्रेकिंगसाठी देशभरातील १४ कंपन्यांचे सुमारे २०० ट्रेकर्स सहभागी झाले होते.

त्यामध्ये जिद्दी असोसिएटचे प्रमुख अरविंद नवेले यांच्या मार्गदर्शनाखाली मंदार सावंत, संतोष काटकर, स्विटी बेंद्रे, शामसुंदर शेट्ये, शीतल शेट्ये, हेमंत खटीक, प्रतीक माळी, रोहन शिवलकर, श्रुती सावंत, जिद्दी असोसिएटचे मार्गदर्शक प्रसाद शिवगण, नेहा घाणेकर सहभागी झाले होते. हिमालय पर्वतरांगातील सुमारे १२ हजार ५०० फूट उंचीवरील केदारकंठ शिखर करण्याच्या ट्रेकिंगसाठी रत्नागिरी येथील ट्रेकर्सनी २० ते २९ जानेवारी असा प्रवास केला.

त्यामध्ये प्रत्यक्षात केदारकंठ शिखरावर तीन दिवस ट्रेकिंग करून हे शिखर गाठले. यासाठी संकरा व्हिलेज ते जुडा का तालाब ते केदारकंठ बेस कॅम्प येथून रात्री २ वा. केदारकंठ समिटसाठीचा प्रवास सुरू झाला. प्रतिकूल हवामानाशी जिद्दीने सामना करत त्यांनी हा अवघड ट्रेक पूर्ण करत केदारकंठ समिटचा पहिला मान पटकावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *