तालुक्यातील हेदली गावानजीक खेड-खोपी मार्गावर रविवारी क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूंना घेऊन निघालेल्या पिकअपची रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरला धडक बसली आहे.
या अपघातात एकजण गंभीर जखमी असून पाचजण किरकोळ जखमी आहेत. खेड-खोपी मार्गावर रविवारी दि. २८ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास पिकअप गाडीतून (एमएच ०८ एपी ५४९१) मध्ये १५ तरुण -क्रिकेट खेळण्यासाठी जात असताना हेदली या ठिकाणी जाताना पिकअप चालकाचे
नियंत्रण सुटून तो डंपर (एमएच ०९ आयपी ९५८१) वर धडकला. या अपघातात अथर्व अजित जाधव (१४), राज दिलीप बुरटे (१४), सोहम प्रदीप बुरटे (१७), यश दिनेश बुरटे (१७), दिनेश दिलीप कानेकर (३२) हे जखमी झाले.
अपघातानंतर मदत ग्रुपचे प्रसाद गांधी आणि त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. सर्व जखमी तरुण खेडमधील वेरळ या गावातील असल्याचे समजते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















