रत्‍नागिरी : विवाहबाह्य संबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीचा केला खून

banner 468x60

तालुक्यातील नांदिवडे येथे विवाहबाह्य संबंधातून महिलीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्‍याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे.

यात पती सुरेश धोंडू पडवळ (वय 64,रा.भंडारवाडा नांदिवडे, रत्नागिरी) यांचा खून केला. ही घटना 26 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.

या प्रकरणी जयगड पोलिसांनी संशयित पत्नी आणि तिचा प्रियकर (दोन्ही रा.भंडारवाडा नांदिवडे, रत्नागिरी) या दोघांना रात्री उशिरा अटक केली.

या दोघांनी कट रचून हत्याराने सुरेश पडवळ यांच्या हाता-पायांवर, छातीवर आणि डोक्यावर मारून त्यांचा खून केल्‍या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा अधिक तपास जयगड पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *