Breaking News
रत्नागिरी : जिल्ह्यातील मंडणगड, दापोली व खेड येथील पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतींसाठी शासनाची मंजुरी 30 कोटींच्या निधीस मंजुरी; ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम करण्याचा निर्णय – राज्यमंत्री योगेश कदम दापोली : 7/12 उताऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी 10 हजारांची लाच घेताना ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)ला रंगेहात अटक, लाच घेण्यात महिला अधिकारीही मागे नाहीत, सततच्या लाच मागणीला कंटाळून तक्रार दाखल रत्नागिरी : पोलीस असल्याचे सांगून वृद्ध महिलेची सोन्याची चेन लुटली खेड : पंचायत समिती कार्यालयात हृदयविकाराचा झटका, चिपळूण येथील शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू दाभोळ : समुद्रकिनारी अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाले, तरुणावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

रत्नागिरी : मारुती मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

banner 468x60

पहाटे मारुती मंदिर येथील मंदिरात अज्ञात इसमाने चोरी करून मंदिरात असणारी दान पेटी फोडून पैसे चोरी केली.

banner 728x90 banner 728x90

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शहरातील सीसीटिव्ही फुटेज तपासत काही तासातच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या.शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकामार्फत मारुती मंदिरातील सी.सी.टी.व्ही फुटेज तसेच शहरातील अन्य परिसरांमधील सी.सी.टी.व्ही फुटेज यांची लागलीच पडताळणी करण्यात आली

तसेच गोपनीय माहितीच्या आधारे रत्नागिरी शहरामध्ये आरोपीचा शोध घेण्यात आला व आज विजय रमनेवल प्रजापती, वय 30 वर्षे, व्यवसाय मजुरी, सध्या राहणार कोकण नगर मूळ राहणार अलाहाबाद उत्तर प्रदेश याला ताब्यात घेण्यात आले आहे व मारुती मंदिरातील

दान पेटी मधून चोरलेली एकूण 84,588 रूपये रक्कम जप्त करण्यात आलेली आहे. पहाटे मारूतीमंदिर येथील मंदिरात चोरी झाल्याचे शहर पोलीस ठाण्याच्या गुड मॉर्निंग स्क्वॉड मधील पोहेकॉ. संतोष सावंत यांना निरीक्षणा दरम्याने निदर्शनास आल्याने तात्काळ पहाटे साडेपाच वाजता शहर पोलीस ठाण्याचे

गुन्हे प्रकटीकरण पथक घटनास्थळी दाखल झाले व पाहणी करून शहर पोलीस ठाणे येथे मंदिराच्या ट्रस्ट कडून खबर मिळाल्याने गुन्हा रजिस्टर नंबर 37/2024 भा.द.वि संहिता कलम 457, 380 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच आरोपी विजय रमनेवल प्रजापती याने रत्नागिरी व अन्य ठिकाणी आणखी चोरी-घरफोडीचे गुन्हे केले आहेत का? याचा अधिक तपास या पथका मार्फत सुरू आहे.

ही कारवाई, गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे, सपोफौ दीपक साळवी, पोहेकॉ संतोष सावंत, पोहेकॉ अरुण चाळके, पोहेकॉ अमोल भोसले, पोहेकॉ राहुल जाधव, पोनि मयेकर व पोशि अमित पालवे यांनी केली. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या पथकास दहा हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *